‘सह्याद्री’च्या यशाचा नसरापूरमधील शेतकऱ्यांकडून अभ्यास

‘सह्याद्री’च्या यशाचा नसरापूरमधील शेतकऱ्यांकडून अभ्यास
Published on

नसरापूर, ता.२७ : नाशिक येथील सह्याद्री फार्म या पूर्ण सहकारी तत्वावर चालणाऱ्या उत्पादक कंपनीच्या यशाचा अभ्यास करण्यासाठी नसरापूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी दौऱ्याचे आयोजन केले होते. नसरापूर ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या सहलीत १७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी शेतीपूरक व्यवसाय व शेतकऱ्यांच्या एकजुटीची माहिती घेतली.


नाशिकच्या मोहाडी येथील उच्चशिक्षित शेतकरी विलास शिंदे यांनी दहा शेतकऱ्यांना एकत्र घेत सुरू केलेल्या सह्याद्री फार्म हा सहकारी शेतीमध्ये एक अगळा वेगळा प्रयोग यशस्वी ठरला आहे. त्याच्या अभ्यास करण्यासाठी शेतकऱ्यांना नेण्यात आले होते. या दौऱ्यात नसरापूरच्या सरपंच उषा विक्रम कदम, उपसरपंच सुधीर वाल्हेकर, ग्रामसेवक विजय कुलकर्णी, माजी उपसरपंच गणेश दळवी, सदस्य नामदेव चव्हाण यांच्यासह नसरापूर येथील शेतकरी सहभागी झाले होते.

सह्याद्री फार्म या उत्पादक कंपनीचे २० हजारांहून अधिक शेतकरी आहेत. या माध्यमातून द्राक्ष, टोमॅटो, भाजीपाला उत्पादनासाठी सभासदांना सर्व प्रकारचे सहाय्य केले जाते.
शेतकऱ्यांना शेतीमधील मार्गदर्शनासाठी स्वयंचलित हवामान केंद्रे, सेन्सर्स सॅटेलाइट, इमेजिंग सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून सुमारे बाराशे महिला व तरुणांना प्रत्यक्ष तर साडेतीन हजाराहून अधिक जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळत आहे.
05237

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com