

खेड शिवापूर, ता. ४ : श्रीराम नगर बांडेवाडी (ता. हवेली) येथे श्री रामजन्मोत्सवानिमित्त गुढीपाडव्या पासून श्रीरामनवमीपर्यंत कीर्तन, नामयज्ञ तथा श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे.
श्रीरामनगर बांडेवाडी येथे दरवर्षी मोठ्या स्वरूपात रामजन्मोत्सव साजरा केला जातो. येथील पुरातन राममंदिरात दरवर्षी रामनवमीच्या अगोदर चैत्र शुद्ध पाडव्यापासून कीर्तन नामयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी या उत्सवाचे ६८ वे वर्ष आहे. यामध्ये नामवंत कीर्तनकारांची सेवा या सोहळ्यात होत आहे. त्यात प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन झाले. पांडुरंग महाराज उगले, सुनील महाराज झांबरे, अक्षय महाराज पिंगळे, सागर महाराज बोराटे, संतदास महाराज मनसुख यांची कीर्तनसेवा झाली आहे. तर शनिवारी (ता. ५) वाशीम येथील सोपना महाराज सानप यांचे कीर्तन होणार आहे.
रविवारी (ता. ६) रामनवमी दिवशी सकाळी ९ ते १२ या वेळेत सुनील महाराज मंगळापुरकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. रामजन्मानंतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सायंकाळी सात वाजता श्रींची मिरवणूक होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन पांडुरंग प्रासादिक भजनी मंडळ, योगिराज वारकरी संप्रदाय व समस्त ग्रामस्थ श्रीरामनगर यांच्या वतीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.