जांभळीत शॉर्टसर्किटमुळे घराला आग
नसरापूर, ता. ३ : जांभळी (ता.भोर) येथे गुरुवारी (ता.३) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दत्तात्रेय कोंडिबा भोरडे (वय ७५) यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामुळे घरात ठेवलेल्या जनावरांची वैरण खाक झाली.
भोरडे यांच्या घरामधील जुन्या वीज मीटरच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाली. त्यामुळे आग लागून घराच्या माळ्यावर ठेवलेला भाताचा पेंढा जळाला व आग घरात आग पसरली. भोरडे कुटुंबीयांना आग लागल्याची चाहुल लागताच ते घराबाहेर पडले. यावेळी नागरिकांनी घरातील गॅस सिलिंडर तातडीने बाहेर काढला. मात्र, आग पसरल्याने घरातील इतर वस्तु वाचवता आल्या नाहीत.
आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी राजगड पोलिसांना माहिती दिली. राजगड पोलिस ठाण्याचे हवालदार मंगेश कुंभार व सहकाऱ्यांनी पहाटेच तिकडे धाव घेतली. भोर नगरपालिकेच्या अग्निशामक वाहनास तातडीने बोलावले. आग आटोक्यात आणताना काही ग्रामस्थांना विजेचा धक्का बसला. यामुळे मदत कार्य थांबले होते. अग्निशामकचे वाहन आल्यानंतर पोलिस, ग्रामस्थांनी चार तासात आग अटोक्यात आणली.
आगीत भोरडे कुटुंबाच्या घरातील कपडे, धान्य, कपड्यांच्या कपाटात ठेवलेले रोख ३० हजार रुपये व इतर सर्व वस्तू जळून गेल्या. आगीच्या घटनेची राजगड पोलिसांनी नोंद केली. ग्रामसेविकेने नुकसानीची पाहणी केली. दरम्यान महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा उद्या होईल, असे सांगितले. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
पोलिस ॲकॅडमीची फी कशी भरायची?
दत्तात्रेय भोरडे यांचे कुटुंब इतरांच्या शेतात काम तसेच शेळीपालन करून उदरनिर्वाह करते. भोरटे यांचा मुलगा भरत यांना तीन मुली आहेत. त्यातील पूनम हिने महाविद्यालयात शिकत पोलिस भरतीसाठी नसरापूर येथे ॲकॅडमी लावली आहे. त्यासाठी साठवून ठेवलेली फीचे तीस हजार रुपये जळून गेली. यामुळे आता भोरडे कुटुंबीयांपुढे फी कशी भरायची? असा प्रश्न पडला आहे.
05530
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.