जखमी झालेल्या कामगाराचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू
खेड शिवापूर, ता. ५ : शिवरे (ता.भोर) येथील डब्लुओएम (युनिव्हर्सल) कंपनीत संजय अनंता वाडकर (वय ५२, रा.वेळू, ता.भोर)
यांच्या अंगावर चार जूनला अवजड साहित्य पडले. यामुळे त्यांच्या छाती व पाठीस गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना सहा जूनला
पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा २३ जूनला मृत्यू झाला.
वाडकर यांच्या मृत्यूबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे हवालदार वाय. आर. खोंडे यांनी शुक्रवारी (ता.४) राजगड पोलिस ठाण्यास खबर दिली आहे. वाडकर हे डब्लुओएम कंपनीत चार जूनला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कामावर असताना त्यांच्या अंगावर कंपनी मधील जडसाहित्य पडले. त्यामुळे वाडकर यांच्या छातीस व पाठीस गंभीर दुखापत झाली. त्यांना सहा जून रोजी त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना २३ जूनला रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. या बाबत हॉस्पिटलमधील डॉ. सचिन राठी व ब्रदर प्रवीण तांबे यांनी भारती पोलिस ठाण्यात माहिती दिली. यानंतर अपघाताची घटना घडलेली कंपनी शिवरे (ता.भोर) येथील असल्याने ही खबर राजगड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. याबाबत राजगड पोलिस ठाण्याचे हवालदार नीलेश राणे पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.