दिवळेतील पोल्ट्री व्यावसायिकाची फसवणूक

दिवळेतील पोल्ट्री व्यावसायिकाची फसवणूक

Published on

नसरापूर, ता. १८ : दिवळे (ता. भोर) येथील पोल्ट्री व्यावसायिकाची तब्बल एक कोटी २६ लाख रुपयांची मागणी करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संतोष विठ्ठल बाठे (वय ४६) यांनी संतोष ट्रेडर्स फलटणचे संतोष सदाशिव गायकवाड (रा. तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा) याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाठे यांनी २०१८ ते २०२० या कालावधीत ‘छत्रपती ॲग्रोटेक प्रा. लि.’ या नावाने पोल्ट्री व्यवसाय सुरू केला होता. याच दरम्यान गायकवाड याने स्वत:ला पोल्ट्री माल पुरवठादार म्हणून ओळख करून देत बाठे यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला व्यवहार सुरळीत झाले. त्यानंतर गायकवाड याने ‘तुमचे पोल्ट्री खाद्य बनविण्यासाठी जेवढी मका लागेल तेवढी मका पुरविण्याची मी हमी घेतो’ असे सांगितले. बाठे यांनी व्यवहार चालु राहण्याकरिता आपल्या कंपनीच्या नावाचे दोन कोरे सुरक्षा धनादेश गायकवाड यास दिले.
बाठे यांनी सर्व व्यवहारांचे पैसे वेळेवर दिले असतानाही गायकवाडने बाठे यांनी दिलेल्या कोऱ्या धनादेशचा गैरवापर केला. कोविड लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय थांबलेला असतानाही २४ जुलै २०२० या दिवशी गायकवाडने ७९ लाख ५४ हजारांचा धनादेश बाऊंसची वकिलामार्फत नोटीस पाठवली. नंतर ३१ ऑगस्ट २०२० या दिवशी ४८ लाख ४९ हजारांची दुसरी नोटीस पाठविली. दोन्ही नोटीसांमध्ये एकूण २५ ट्रक क्रमांकांच्या आधारे माल टाकला असल्याचे दाखविले होते. तसेच त्यासाठी बनावट पावत्या, खोटे बिलही देण्यात आले होते.
बाठे यांनी असा कोणता माल घेतला नसल्याने माल पाठवलेल्या या गाड्यांचे क्रमांक प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडून पडताळले असता, गंभीर बाब समोर आली. ट्रक म्हणून दाखवलेली वाहने प्रत्यक्षात दुचाकी, कार, मिनीबस व ऑटो रिक्षा असल्याचे उघड झाले. त्यामुळे बनावट गाडी क्रमांक व खोट्या दस्तऐवजांच्या आधारे करोडोंची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे निष्पन्न झाल्याने गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, गायकवाड याने इतर काही व्यावसायिकांची देखील अशीच फसवणूक केली असून त्याबाबत केसेस चालु असल्याची माहिती बाठे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com