तीन महाविद्यालयांत ‘यिन क्लब’ची स्थापना
नसरापूर, ता. २१ : सकाळ माध्यम समूहाच्या ‘यिन’ या व्यासपीठाच्या वतीने यंदाही महाविद्यालयात यिन क्लबच्या स्थापनेचा शुभारंभ झाला आहे. भोर तालुक्यातील नव सह्याद्री शैक्षणिक संकुल, शंकरराव भेलके महाविद्यालय, राजगड ज्ञानपीठ संकुल या तीन महाविद्यालयांमध्ये ‘यिन क्लब’ची स्थापना करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणाला संधी मिळणार आहे.
पुणे ग्रामीणमधील विविध महाविद्यालयांत ‘यिन क्लब’ मध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ सुरू झाली आहे. वर्षभरामध्ये ‘यिन’च्या वतीने आर्थिक साक्षरता, उद्योजकता विकास, मानसिक आणि भावनिक आरोग्य, योग आणि ध्यान, सकारात्मक विचार, सेवा आणि एआय या विषयांवर महाविद्यालयीन, तालुका आणि जिल्हास्तरावर ‘यिन संवाद’ अथवा सामाजिक उपक्रम घेतले जातात. यातून विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक, कलात्मक नेतृत्वविकासाला गती मिळण्यास मदत होते. या महिन्यात ‘यिन क्लब’च्या वतीने माझे महाविद्यालय-माझी स्वच्छता, वृक्षारोपण हे उपक्रम विद्यार्थी राबवीत आहेत.
विद्यार्थ्यांना या क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात येत असून या उपक्रमात जोडण्यासाठी संपर्क क्रमांक ७०५८१५११११ यावर यिन राज्य समन्वय अधिकारी अनिकेत मोरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भोर तालुक्यातील तीन महाविद्यालयात यंदाही ‘यिन क्लब’ची स्थापना करण्यात आली. यात नव सह्याद्री शैक्षणिक संकुलामध्ये नव सह्याद्री एम.बी.ए. महाविद्यालयाचे संचालक डॉ. तानाजी दबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच यिनचे महाविद्यालयीन समन्वय अधिकारी डॉ. सुहास पाखरे व सहाय्यक अधिकारी प्रा. सागर चव्हाण यांच्या पुढाकाराने क्लबची स्थापना झाली. तसेच नसरापूर येथील शंकरराव भेलके महाविद्यालयात प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच यिनचे महाविद्यालयीन समन्वय अधिकारी डॉ. जगदीश शेवते व सहाय्यक समन्वय अधिकारी दयानंद जाधवर यांच्या पुढाकाराने क्लबची स्थापना झाली.
तर धांगवडी येथील राजगड ज्ञानपीठ संकुलात तंत्रनिकेतनचे प्राचार्य डी.के. खोपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच यिनचे महाविद्यालयीन समन्वय अधिकारी आर.एम. वाघमोडे, व सहाय्यक समन्वय अधिकारी पूजा खाडे यांच्या पुढाकाराने क्लबची स्थापना करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.