वेळू येथील अपघातात दोघांचा मृत्यू

वेळू येथील अपघातात दोघांचा मृत्यू

Published on

खेड शिवापूर, ता.३० : वेळू (ता.भोर) हद्दीतील ससेवाडी उड्डाणपुलाच्या उतारावरून येणाऱ्या भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक सातारा-पुणे महामार्गावरील विरोधी लेनवर जाऊन कंटेनरसह जीप व तीन दुचाकींना धडकला. यामुळे बुधवारी (ता. ३०) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
भीषण अपघातात दुचाकी युनिकॉन मोटारसायकलवरील प्रथमेश महादेव रेडेकर (वय ३२ रा. सांगली) व केटीएम दुचाकीवरील चालक दिव्यम सुनील निकम (वय ३१ रा.नेहरुनगर, धुळे) या दोघांचा मृत्यू झाला. पीकअप जीप चालक संजय श्रीरंग खाटपे (वय ४२ रा.हिंगेवाठार ता.भोर) हे गंभीर जखमी झाले आहेत.
वेळू गावच्या हद्दीत पुण्याकडून सातारा बाजूकडे जाणारा ट्रक (क्र.एम एच ०४ के यु ११४४) ससेवाडी उड्डाणपूल उतरत असताना ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. हा भरधाव ट्रक रस्ता दुभाजक पार करून पलीकडील सातारा-पुणे लेनवर गेला. यावेळी समोरून येणाऱ्या कंटेनरला (क्र.एच आर ५५ ए पी ३३५६) धडकून ट्रक पलटी झाला. यावेळी शेजारून जाणाऱ्या पीकअप जीप (क्र.एमएच १२ जे एफ ५२८८), तसेच केटीएम दुचाकी (क्र.एम एच १८ बीबी ३९९९), युनिकॉन मोटारसायकल (क्र.एम एच १० डी एक्स ५६९४) व स्प्लेंडर मोटारसायकल (क्र.एम एच१२ एम वाय १४५५) या वाहनांवर पलटी झालेला ट्रक पडल्याने तीनही दुचाकीचालक व पीकअप जीपचालक गंभीर जखमी झाले.
दरम्यान, अपघातग्रस्तांना स्थानिकांनी तसेच तेथील डब्लुओएम कंपनीच्या रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेले. परंतु प्रथमेश व दिव्यम या दुचाकीचालकांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे भारती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले.
अपघातास जबाबदार असलेला ट्रक चालक मेहताब दफेदार (रा. कोठावली पश्चिम बंगाल) यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस हवालदार सागर गायकवाड यांनी दिली आहे.

05634

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com