विशाल कोंडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नसरापूर, ता.१ : संग्राम थोपटे यांचे समर्थक नसरापूर पंचायत समिती गणातील भाजपचे इच्छुक उमेदवार विशाल ऊर्फ बंटी सुभाष कोंडे यांनी शुक्रवारी (ता.१) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला.
कोंडे यांच्या समवेत नसरापूरच्या सरपंच उषा विक्रम कदम, उपसरपंच नामदेव चव्हाण व माजी उपसरपंच संदीप कदम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आगामी काळात नसरापूर पंचायत समिती गणामधून विशाल कोंडे यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर होऊ शकते.
काँग्रेसमध्ये असलेले व संग्राम थोपटे यांच्याबरोबर भाजपमध्ये गेलेले कोंडे यांना आमदार शंकर मांडेकर यांनी तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
यावेळी त्यांच्या समवेत नसरापूरच्या विद्यमान सरपंच उषा कदम, उपसरपंच नामदेव चव्हाण, माजी उपसरपंच संदीप कदम तसेच नसरापूर परिसरातील अनेक गावांतील कार्यकर्त्यांनी देखील यावेळी प्रवेश केला.
यावेळी भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, रणजित शिवतरे, भालचंद्र जगताप, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले.
प्रवेशानंतर बोलताना विशाल कोंडे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या कामाची व निर्णय घेण्याची पध्दत आवडल्याने तसेच भोरचे आमदार शंकरभाऊ यांची सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करण्याची तडफ पाहून मी राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार आहे.
05638
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.