वेळूत सोयाबीन पिकासाठी मार्गदर्शन
खेड शिवापूर ता.४ : वेळू (ता.भोर) येथे नसरापूर कृषी मंडलाच्या वतीने शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. यावेळी सोयाबीन पिकावरील कीड व रोग नियंत्रणाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत पुष्प विज्ञान संशोधन संचालनालय, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने पीएम किसान सन्मान निधी दिवस व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, तेलबिया पीक-सोयाबीन अंतर्गत शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर फिरके यांनी सोयाबीन पिकावरील कीड व रोग या विषयी मार्गदर्शन करून नियंत्रणाची माहिती दिली. फुलशेती संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गणेश कदम यांनी फुलशेतीची तांत्रिक माहिती दिली.
पुष्प विज्ञान संशोधन संचालनालय, पुणेचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बसीत रझा, शास्त्रज्ञ डॉ. के. प्रभा आदींनी मार्गदर्शन केले.
नसरापूर मंडलकृषी अधिकारी सूरज पाटील यांनी प्रास्ताविक तर सहाय्यक कृषी अधिकारी विनायक पारठे यांनी स्वागत केले.
शिबिरास जिल्हा नियोजन समिती सदस्य अमोल पांगारे, वेळूचे सरपंच सुरेश पांगारे, माजी सरपंच अमोल बबन पांगारे, कासुर्डीचे माजी सरपंच दत्तात्रेय शिंदे, वेळूचे माजी सरपंच शिवाजी वाडकर , नैसर्गिक शेती तज्ज्ञ गुलाब घुले, कृषी अधिकारी विजय शिशुपाल व वेळू व कासुर्डी खे.बा. येथील शेतकरी उपस्थित होते.