नसरापूरमध्ये गुलाल विरहीत मिरवणूक

नसरापूरमध्ये गुलाल विरहीत मिरवणूक

Published on

नसरापूर, ता. ३ : नसरापूर येथील सार्वजनीक गणेश मंडळांपैकी पाच मंडळाच्या गणेश विसर्जनाची मिरवणूक सातव्या दिवशी पार पडली गुलाल विरहीत व शांततेत झालेल्या या मिरवणुकीत आकर्षक सजावट केलेल्या रथा मध्ये गणरायाला निरोप देण्यात आला यावेळी मिरवणुकीत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
नसरापूर मधील श्रीराम तरुण मंडळ,नटराज तरुण मंडळ,श्रीकृष्ण मित्र मंडळ,भैरवनाथ तरुण मंडळ,शिवराज मित्र मंडळ या सार्वजनीक गणेश मंडळांच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आले श्रीराम तरुण मंडळाने त्यांच्या गणेश मंदीराच्या कामासाठी या वर्षी गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुक साध्या पध्दतीने साजरा केला
नटराज तरुण मंडळाने या वर्षी गणेश मंदिरातच मुर्ती बसवुन गणेशोत्सव साजरा केला मात्र मिरवणुक मोठ्या उत्साहात फुलांनी आकर्षक सजावट केलेल्या भक्तीरथा मध्ये काढली रथामध्ये फेटा घातलेली मुर्ती विराजमान होती रथावर विठ्ठलाची प्रतिमा व संत तुकारामाची भजन करत नाचणारी मुर्ती सर्वांचे लक्ष वेधुन घेत होती तर मिरवणुकीसमोर नाशिक ढोलताशांचा गजर करत फुलांची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी निळ्या रंगाचे कुर्ते व पांढरी टोपी तसेच महिलांनी गुलाबी कलरचे फेटे फरिधान करुन सहभागी झाले होते त्या मुळे मिरवणुकीला एक वेगळीच आकर्षकता आली होती.
श्रीकृष्ण मित्र मंडळाने देखिल साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला परंतु विसर्जन मिरवणुक मात्र मंडळाच्याच कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या फुलांनी सजवलेल्या आकर्षक विठ्ठल रथामध्ये काढण्यात आली होती. मिरवणुकी समोर सासवड येथील ढोल ताशा पथकाचा गजर चालला होता. या मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला देखिल रंगीत फेटे घालून मिरवणुकीत सहभागी होते फाटाक्यांची आतिषबाजी करत शांततेत मिरवणूक पार पाडण्यात आली.
भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने फुलांच्या सजावटीमध्ये आकर्षक रथामध्ये मिरवणूक काढली. समोर लावलेल्या मुझिक सिस्टिमवर तरुणांनी नृत्य करत मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणूक काढली.
शिवराज मित्र मंडळाने फुलांनी सजवलेल्या आकर्षक गजरथात ‘श्रीं’ची मिरवणूक काढली. मिरवणुकीमध्ये गुलालाचा वापर केला नाही. राजगड पोलिस ठाण्याच्या वतीने यावेळी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com