कामथडी येथे वासरू ठार
नसरापूर, ता. १ : कामथडी (ता. भोर) येथे डोंगरभागात चरण्यासाठी गेलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्याने वासरू ठार झाले असून परिसरात यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कामथडी येथील शेतकरी रमेश प्रताप पवार यांची गुरे रविवारी (ता. ३० नोव्हेंबर) गावच्या थोरल्या कूपात या डोंगरात चरण्यासाठी गेली असताना सायंकाळच्या सुमारास त्यांची गुरे परत गोठ्याकडे आली मात्र एक तीन वर्षाचे वासरू परत आले नाही ते परत का आले नाही हे पाहण्यासाठी पवार व त्यांचे मित्र हातात बॅटरी घेऊन गेले असता गुरे नेहमी चरतात त्या ठिकाणी त्यांचे वासरू जखमी होऊन मृत पडलेले व जवळच बिबट्या देखील दिसला यामुळे ते जवळ न जाताच भयभीत होऊन परत माघारी आले. दुसऱ्या दिवशी मृत वासराला पाहण्यासाठी गेले असता तेथून ते बिबट्याने गायब केल्याचे निदर्शनास आले.
याबाबत शेतकरी पवार यांनी वनविभागाच्या कार्यालयात झालेल्या घटनेची माहिती दिली आहे. ही घटना वनहद्दीत का वनहद्दी बाहेर घडली आहे काय याबाबत माहिती घेणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले तसेच परिसरात बिबट्याच्या हालचालीबाबत घ्यावयाच्या काळजी बाबत जनजागृती केली जाणार असल्याचे सांगितले. तीन वर्षे वयाच्या वासराच्या मृत्यूमुळे शेतकरी पवार यांचे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

