सारोळ्यात कुटुंबावर प्राणघातक हल्ला

सारोळ्यात कुटुंबावर प्राणघातक हल्ला

Published on

नसरापूर, ता. ३० : सारोळे (ता. भोर) येथे जमिनीच्या पैशांच्या वादातून मोटारीने व कोयते हातात घेऊन आलेल्या आरोपींनी एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला करत गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (ता. २८) सायंकाळी घडली.
याप्रकरणी विकी दीपक पवार (वय २७, रा. सारोळा, ता. भोर) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष खोपडे (पूर्ण नाव व पत्ता अपूर्ण) हा मोटार (क्र. एमएच १२ टिएस १८१८) मधून पाच अनोळखी व्यक्तींसह फिर्यादीच्या घरासमोर आला. जमिनीच्या पैशांच्या कारणावरून वाद घालून आरोपींनी फिर्यादीच्या आईच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच फिर्यादी विकी पवार, वडील दीपक, भाऊ अजय व वहिनी लता यांना मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने थेट मोटार वेगात मागे घेऊन अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यात फिर्यादीचे वडील दीपक पवार यांना मोटारीचा धक्का लागून दुखापत झाली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना इथेच थांबली नाही. काही वेळाने आरोपींचे साथीदार पुन्हा पाच मोटारसायकलवरून गावात आले. कोयते हातात घेऊन त्यांनी फिर्यादीच्या घराचे दरवाजे, खिडक्या व मोटारसायकलची तोडफोड करत उघडपणे दहशत निर्माण केली. या घटनेमुळे सारोळा गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी व त्यांचे अनोळखी साथीदार यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com