कामथडी-भोंगवली गटात रंगणार दिग्गजांची लढत
नसरापूर, ता. २० : भोर तालुक्यातील कामथडी- भोंगवली या जिल्हा परिषद गटात अनेक माजी पदाधिकारी व मातब्बर नेते इच्छुक असल्याने दिग्गजांची लढत रंगणार आहे. या ठिकाणी उमेदवारी देताना पक्षाच्या नेते मंडळीची चांगलीच कसरत सुरू असून, तालुक्यातील पूर्व भागातील जनतेचे या गटाच्या उमेदवारी व होणाऱ्या लढतीकडे लक्ष लागले आहे.
कामथडी, उंबरे व करंदी ही तीन गावे नव्याने समावेश होऊन जुन्या संगमनेर- भोंगवली गटाचे कामथडी- भोंगवली असे नामकरण झाले आहे. माजी आमदार दिवंगत काशिनाथराव खुटवड व राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या या गटाचे सन २०१७ मध्ये तालुक्यात तीन गट झाल्यावर या गटाचे विभाजन होऊन महामार्ग पट्ट्यातील गावांना घेऊन वेळू- भोंगवली असा गट तयार झाला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसला मात देत शिवसेनेने विजय मिळवला होता. तर, भोंगवली पंचायत समिती या एका गणात काँग्रेसने विजय मिळवला होता. आता गट पुन्हा पूर्व स्वरूपात झाला असल्याने याचा फायदा कोणता पक्ष उचलणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. गटाची रचना तालुक्यातील पूर्व भागातील सारोळा ते गुणंद वाठार गावापर्यंतचा भाग, महामार्गावर कामथडी ते सारोळा हा भाग, कापूरव्होळ भोरफाटा ते वाकांबे धरण पट्ट्यातील भाग, तसेच कासुर्डी ते मोहरी हा गुंजवणी नदीलगतचा भाग, असा विस्तीर्ण मतदारसंघ आहे.
असे आहे आरक्षण
कामथडी- भोंगवली गट सर्वसाधारण जागेसाठी खुला असून, गटातील भोंगवली पंचायत समितीदेखील सर्वसाधारण जागेसाठी खुली आहे, तर कामथडी पंचायत समितीसाठी सर्वसाधारण महिला राखीव आहे. तालुक्याचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने या कामथडी गणास महत्त्व आहे.
मतदार
पुरुष : १०३८९
महिला : १०६०६
एकूण : २०९९५
गट गणातील गावे :
गट : ५३
भोंगवली गण : २६
कामथडी गण : २७
गटातील मोठ्या मतदानाची निर्णायक गावे
कामथडी : २२३७, करंदी : १०८९, कापूरव्होळ : १४११, मोहरी बुद्रुक : १३७१, निगडे : १०६४, किकवी : १८३, केंजळ : १५०२, संगमनेर : १७४७, हर्णस : १२०७, नऱ्हे : १३६१, सारोळे : २००५, भोंगवली : २९५६, न्हावी : २२२४.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

