बनेश्वर येथे जीवनगौरव पुरस्काराने सहा जणांचा सन्मान

बनेश्वर येथे जीवनगौरव पुरस्काराने सहा जणांचा सन्मान

Published on

नसरापूर, ता.१७ : नसरापूरमधील (ता. भोर) श्री क्षेत्र बनेश्वर येथे महाशिवरात्र उत्सवातील ३९ व्या हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. यावेळी झालेल्या समारंभांत सहा जणांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री बनेश्वर सेवा मंडळाच्या वतीने या वर्षी नऊ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत नामवंत कीर्तनकारांची सेवा तसेच दररोज सायंकाळी रामकथा व परिसरातील भजनी मंडळांचा जागर ठेवला होता. या कीर्तन महोत्सवात नवनाथ महाराज गोगावले, महादेव महाराज शास्त्री,पांडुरंग महाराज घुले, डॉ. भावार्थ महाराज देखणे, गुरुवर्य बंडातात्या महाराज कराडकर, हरिदासजी महाराज पालवे, विठ्ठल महाराज दिवेगावकर यांची कीर्तनसेवा व काल्याचे कीर्तन राजेंद्र महाराज येप्रे यांचे झाले.

राजेंद्र महाराज येप्रे यांना वारकरी जीवनगौरव पुरस्कार, राजगड ज्ञानपीठ अध्यक्ष माजी आमदार संग्राम थोपटे यांना शिक्षणरत्न पुरस्कार, राजाराम महाराज बाठे समाजभूषण पुरस्कार, ध्रुव प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक कामे व अनाथ मुलांचा संभाळ करणारे राजीव केळकर यांना समाजसेवा पुरस्कार, कांबरे येथील कांता महाराज यादव यांना कृषिरत्न पुरस्कार, तर डॉक्टर ऋषिकेश बडवे यांना वैद्यकीय सेवा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.

यावेळी संतवीर बंडातात्या महाराज कराडकर यांना त्यांच्या कार्यास एक लाख २५ हजार रुपये देणगी देऊन व कृतज्ञतापत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी रांजणे, उपाध्यक्ष नानासाहेब भिंताडे, गणेश महाराज भगत, गणेश दळवी, अर्जुन मांढरे, मनोहर कोकाटे, संपत तनपुरे, नंदकुमार कोंडे, दीपक काकडे, शिवाजीराव मोहिते, यशवंतराव कदम, डॉ. सुरेश डिंबळे, गणपत डिंबळे, डॉ. विलास इगावे मच्छिंद्र महाराज धावले आदी उपस्थित होते. मान्यवर उपस्थितांमध्ये जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सुके, आबासाहेब यादव, माजी सभापती लहूनाना शेलार, उद्योजक चंदूभैया परदेशी आदी उपस्थित होते

06196

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com