फिलिपाईन्सच्या नागरिकांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

फिलिपाईन्सच्या नागरिकांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Published on

नसरापूर, ता. १९ : पोवेदा फाउंडेशनच्या सदस्य फिलिपाईन्सच्या नागरिकांनी मंगळवारी (ता.१७) करंदी (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या इंग्रजी अभ्यासाच्या तयारीची माहिती घेतली.

जगातील अनेक देशांतील प्राथमिक शाळांशी संपर्क करून, विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभ्यासाची तयारी करून
घेण्यासाठी पोवेदा फाउंडेशन पुढाकार घेते. या फाउंडेशनशी दर आठवड्याला झूम क्लासद्वारे अनेक देशांतील विद्यार्थी जोडले जातात. त्यातून विद्यार्थ्यांचे इंग्रजी व्याकरण विकसित केले जाते. या फाउंडेशन अंतर्गत गेल्या चार पाच वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंदी खेडे बारे हे गावही जोडले आहे. त्याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळतो. यातूनच पोवेदा फाउंडेशननी शाळेसाठी अभ्यासक्रम ॲड करून टॅब दिलेले आहेत. दररोज वेगवेगळ्या इयत्तेतील मुले याचा वापर करतात.
दरम्यान, पोवेदाचे वेगवेगळ्या देशातील प्रतिनिधी दरवर्षी शाळेत भेट देऊन याचे मूल्यमापन करून अडीअडचणी सोडवतात. आत्तापर्यंत तैवान, अमेरिका, स्पेन या देशातील प्रतिनिधी यांनी भेट दिलेली आहे.
फिलिपिन्स या देशातील अँनी मँम, मिस अँनी, मिस चिया व लुईस केनेथ प्रतिनिधी शाळेत भेट दिली. विद्यार्थ्यांशी इंग्रजीमध्ये संवाद साधला. विद्यार्थ्यांचा छान प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला, उत्तम अभ्यासक्रम राबवलेला पाहून शाळेस इंग्रजी शैक्षणिक साहित्य भेट दिले.

याप्रसंगी सरपंच नवनाथ गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुप्रिया बोरगे हे हजर होते. हा उपक्रम राबवण्यासाठी शाळेतील शिक्षक पंकज राठोड हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. तानाजी नाईलकर यांनी पाहुण्यांचे स्वागत तर मुख्याध्यापक मनोज जगताप यांनी प्रास्ताविक केले. पंकज राठोड यांनी सूत्रसंचालन केले.

06204

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com