अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू
नसरापूर ता. ४ : पुणे-सातारा महामार्गावर भरधाव अज्ञात वाहनाने ठोकरल्याने रस्ता पार करणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक रामी चंद (वय ४२ सध्या रा. वरवे, ता. भोर, मूळगाव बडालु जि. पिथौरगढ, उत्तराखंड) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर मृत चंद यांच्या पत्नी सुधा दीपक चंद (वय ३३, रा. उत्तराखंड) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मृत दीपक हे वरवे येथील एका पेट्रोलपंपावर कामास होते. मंगळवारी (ता. ३) सायंकाळी आठच्या सुमारास वरवे त्रिमंदीरा समोर रस्ता पार करत असताना त्यांना पुण्याकडून साताऱ्याकडे जाणार्या भरधाव वाहनाने जोरदार ठोकर दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन त्यांना रुग्णालयात नेले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पुढील तपास पोलिस हवालदार सागर गायकवाड करत आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

