

नसरापूर, ता. १२ : पुणे- सातारा महामार्गावर कापूरव्होळ (ता. भोर) येथील हॉटेलवर थांबलेल्या प्रवासी बसमधील महिला प्रवाशाच्या पर्समधून साडेचार लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले.
याबाबत सौरभ राजेंद्र भोसले (वय २९, रा. तळेगाव; मूळगाव बावची, जि. सांगली) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २ मार्च रोजी भोसले हे त्यांच्या पत्नी समवेत सिद्धनाथ ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने (क्र. एम.एच. १० सी.क्यू. ९९७१) गावी चालले होते. त्यावेळी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास बस कापूरव्होळ येथील पेट्रोल पंपाशेजारील हॉटेल सह्याद्री येथे चहापानासाठी थांबली. त्यावेळी भोसले त्यांच्या पत्नीसह बसमधून खाली उतरले. त्यावेळी बसमधून त्यांच्या पत्नीच्या पर्समध्ये ठेवलेले तीन तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे साडेचार लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्याने चोरून नेले. याबाबत राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार मयुर निंबाळकर करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.