‘न्हावी’च्या सभासदांतर्फे आठ कोटींची परतफेड

‘न्हावी’च्या सभासदांतर्फे आठ कोटींची परतफेड
Published on

नसरापूर, ता. ४ : न्हावी (ता.भोर) विविध कार्यकारी सोसायटीच्या ७४० सभासदांनी आठ कोटी १८ लाख रुपयांच्या कर्जाची वेळेवर परतफेड केली आहे. याची दखल घेत जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या हस्ते आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सभासदांना पुन्हा पीक कर्ज वाटपाचा प्रारंभ करण्यात आला.

सोसायटीने २०२५-२६ या वर्षात ७७५ सभासदांना आठ कोटी ५६ लाख रुपयांचे कर्ज दिले होते. त्यापैकी ९४.९५ टक्के वसुली ३१ मार्चपर्यंत पूर्ण झाली. त्यामुळे पहिल्याच दिवशी १२५ सभासदांना १ कोटी ५७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.
यावेळी भालचंद्र जगताप यांच्या हस्ते कमाल मर्यादा पुस्तकाचे पूजन झाले. जगताप यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक करत, वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरासह शासनाच्या ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळेल, असे सांगितले. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष अवधूत सोनवणे, माजी अध्यक्ष नवनाथ सोनवणे, उपाध्यक्ष लक्ष्मण बोंद्रे, विशेष वसुली अधिकारी विनोद काकडे यांच्यासह विविध पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com