फ प्रभागातील क्षणोक्षणी उत्कंठा व यशापयशाची चर्चा
या प्रभागातील घरकुल चिखली येथे होती. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असल्याने मतमोजणीसाठी आलेल्या प्रतिनिधींना प्रवेशापासूनच कसरत करावी लागली. सकाळपासूनच कार्यकर्त्यांमधील मोठ्या प्रमाणात उत्साह वातावरण दिसून येत होते. पोस्टल मतांची मोजणी झाल्यावर त्यात अनेक जागेवर मतांची संख्या कमी जास्त दिसून लागल्याने तेथूनच उत्सुकता ताणू लागली. परंतु ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरू झाली आणि पिछाडीवर असलेल्या उमेदवाराच्या समर्थकांत नाराजी तर आघाडीवर असलेल्या उमेदवारांच्या समर्थकांत उत्साह दिसून येत होता.
दुपारपर्यंत अनेक जागेवरील कल लक्षात येताच आघाडी घेतलेल्या उमेदवाराच्या समर्थकांची प्रवेश दारावर गर्दी वाढत गेली तर मतदारांचा कल पाहता काहींनी काढता पाया घेतला. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निकालाबाबत कमालीची उत्सुकता होती. यशाची प्रत्येकालाच खात्री वाटत होती पण जसजशी मतमोजणी सुरू झाली. तसतसा दिवसभर वेगळे रंग पाहायला मिळाले. भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे या सर्वच पक्षाचे उमेदवार आपला हक्काचा भाग आला आता बघा असे म्हणत काहीसा दिलासा देताना दिसत होते. पण निर्णय आघाडी घेतल्यानंतर मात्र अनेकांनी केंद्र सोडून देणे पसंत केले. अगदी मोजके कार्यकर्ते मात्र शेवटपर्यंत किल्ला लढविताना दिसत होते. आकडेमोड करीत होते. प्रभाग क्रमांक अकरामध्ये मात्र अगदी सुरुवातीपासूनच भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली ही आघाडी वाढवतच गेली. त्यानंतर काही फेऱ्यातच निकाल स्पष्ट झाला. मतमोजणी काहीशी कमी गतीने चालत असल्यामुळे प्रतिनिधींनी नाराजी काही वेळा व्यक्त केली.
मतमोजणी केद्राबाहेर निकाल ऐकण्यासाठी एकच गर्दी झाली होती. विजयाची शक्यता असलेल्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी केली होती. जसजसे निकाल लागू लागले तसतसा उत्साह वाढत गेला. विजयी उमेदवार बाहेर येताच त्याला उचलून घेतले जात होते. जल्लोष साजरा केला जात होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

