नागरगावात भर दुपारी 
तीन ठिकाणी घरफोडी

नागरगावात भर दुपारी तीन ठिकाणी घरफोडी

Published on

न्हावरे, ता. ६ : नागरगाव (ता. शिरूर) येथे चोरट्यांनी भर दुपारी तीन ठिकाणी घरफोडी करून घरातील अंदाजे ५ तोळे सोन्याचे दागिने व दीड लाखांची रोख रक्कम, असा तीन लाख ८६ हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला. एकाच दिवशी आणि तेही भरदुपारी चोरीच्या घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
याबाबत एकनाथ विष्णू नलगे (रा. नलगेवस्ती-नागरगाव) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी (ता. ४) दुपारी साडेबारा ते दीड वाजण्याच्या दरम्यान या चोरीच्या घटना घडल्या आहेत. शिरूर-चौफुला रस्त्यावर नागरगाव येथे एकनाथ नलगे यांच्या घरात चोरट्याने प्रवेश करून घरातील रोख रक्कम चोरून नेली. तर, संतोष नलगे यांच्या घरातून सोने-चांदीचा मौल्यवान ऐवज चोरी केला.
नलगे कुटुंबीय हे लग्नानिमित्त येथील कार्यालयात गेले होते. त्याचवेळी चोरट्यांनी रस्त्यालगत असलेल्या तीन घरांतून भर दुपारी चोरी केली. या घटनेत तब्बल तीन लाख ८६ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.