

न्हावरे, ता.२५: न्हावरे (ता.शिरूर) येथील एका शेतकऱ्याच्या घरातून ऊसतोड मजुराने एक लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी ऊसतोड मजुराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लखन पांडुरंग अडागळे (रा.डोमलगाव-पाण्याच्या टाकीजवळ, ता.अंबड,जि.जालना)असे आरोपीचे नाव असून,मोहन निवृत्ती सरके(वय ४३, रा.न्हावरे, ता.शिरूर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
या घटनेची शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,लखन अडागळे हा न्हावरे परिसरात ऊसतोड करण्याचे काम करत होता.तसेच मोहन सरके यांच्याशी ओळख असल्याचा फायदा घेऊन लखन अडागळे याने मोहन सरके यांच्या न्हावरे परिसरातील निंबाळकर वस्ती येथील घरात प्रवेश केला. त्यानंतर सरके यांच्या घरामध्ये अडकवलेली दुचाकीची चावी व घरातील कपाटातून दहा हजार रुपये चोरले. तसेच अडागळे याने रात्रीचा फायदा घेत सरके यांची घराबाहेर उभी केलेली सुमारे एक लाख रुपये किमतीची बजाज चेतक इलेक्ट्रिक दुचाकी(एम.एच-१२,एक्स.पी.४४०७) आणि घरातील कपाटातून चोरलेली १० हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरला असून, आरोपी लखन अडागळे हा फरार आहे.
याप्रकरणी ऊसतोड कामगाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस करीत आहेत.
पंधरा दिवसात दुसरी घटना
न्हावरे परिसरात सुमारे पंधरा दिवसांपूर्वी तांबेवस्ती येथील एका शेतकऱ्याच्या घरात घुसून ऊसतोड कामगारांच्या अल्पवयीन मुलांनी सुमारे तीन लाख रुपयांची चोरी केली होती.ती घटना नुकतीच घडलेली असून,पुन्हा ऊसतोड कामगाराकडून चोरीची दुसरी घटना उघडकीस आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.