सर्वपक्षीय कार्यकर्त्यांतून न्हावऱ्यात हळहळ व्यक्त

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांतून न्हावऱ्यात हळहळ व्यक्त

Published on

न्हावरे, ता. २८ : अजित पवार यांच्या अपघाती निधनाने न्हावरे (ता.शिरूर) येथील ग्रामस्थ, व्यापाऱ्यांनी न्हावरे गावात ग्रामस्थांनी, व्यापाऱ्यांनी दिवसभर बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली.
पवार यांच्या निधनाने न्हावरे येथील सामान्य नागरिक ते सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमधून हळहळ व्यक्त होत नागरिकांकडून येथील उस्फूर्त बाजारपेठ बंद ठेवली. न्हावरे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच इतरही राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचा अजित पवार यांच्याशी थेट संबंध होता. दादांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना सुरुवातीपासून मानणारा मोठा गट शिरूर तालुक्यातील पूर्व भागात न्हावरे परिसरात त्यांनी निर्माण केला आहे. त्यांच्या निधनाने अनेक लाडक्या बहिणीने ही बाजारपेठेतील आपले व्यवसाय बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. येथील अजित पवार अध्यक्ष असलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री मल्लिकार्जून विद्यालयात अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
02481

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com