बिबट्याचे तीन बछडे आढळल्याने खळबळ

बिबट्याचे तीन बछडे आढळल्याने खळबळ

Published on

न्हावरे, ता. ५ : आंबळे (ता. शिरूर) येथील शेतात दोन दिवसांपूर्वीच ऊस तोड सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते. वनविभागाने त्या बछड्यांची आईशी भेट घडवून आणली होती. मात्र, आता पुन्हा याच ठिकाणी गुरुवारी (ता.५) बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याने येथील परिसरात खळबळ उडाली आहे.
आंबळे येथील प्रकाश बेंद्रे यांच्या शेतातील उसाच्या फडात बछडे दिसल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे व वनपरिमंडल अधिकारी भानुदास शिंदे यांना मिळताच नियतक्षेत्र वनअधिकारी गणेश झिरपे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व वनविभाग रेस्क्यू टीममेंबर शेरखान शेख, वैभव निकाळजे, नेचर गार्ड ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष गणेश टिळेकर, सचिव शुभांगी टिळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व प्रकाश बेंद्रे, विकास उकले, मुकुंद भिवरे, शशिकांत संकपाळ आदींच्या उपस्थितीत बिबट्याच्या तीनही बछड्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, शेतकरी व नागरिकांना योग्य माहिती देत बछड्यांना त्यांच्या आईच्या पुनर्मिलनसाठी शेतात सुरक्षित ठेवले आहे. यावेळी वनविभागाच्या वतीने परिसरात शेतकऱ्यांना शेतात काम करताना काळजी घ्यावी व रात्रीच्या वेळी शेतात फिरू नये, असे आवाहन केले आहे.

आंदोलन करण्याचा इशारा
आंबळे परिसरात चार दिवसांत बिबट्याचे पाच बछडे सापडले आहेत. असे असले तरी वनविभाग फक्त शेतकऱ्यांना सल्ले देत आहे. मात्र, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावत नाही. जर दोन दिवसांत पिंजरा बसवला नाही तर आंदोलन करू असा इशारा शेतकरी प्रकाश बेंद्रे यांनी दिला आहे

02488, 02489

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com