

न्हावरे, ता. ४ : शिरूर- चौफुला महामार्गावर शिरूर तालुक्यातील आंबळे- न्हावरे शिवेवर शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ट्रकला धडकून दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत शिरूर पोलिसांनी माहिती दिली की, आंबळे येथे मानकेश्वरी लॉन्ससमोर शिरूरकडे जाणाऱ्या लेनवर कोणतीही खबरदारी न घेता ट्रक (क्र.एम.एच १६ सी.सी ९७७९) रस्त्यावर उभा केला होता. शुक्रवारी सायंकाळी कारेगाव (ता. शिरूर) येथे राहणारे सूर्यकांत अंगद सूर्यवंशी (वय ४०) हे त्यांचा मित्र दिनेश राम यांच्यासह स्प्लेंडर दुचाकीवरून आलेगावकडून कारेगावकडे जात होते. यावेळी आंबळे येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंधारामुळे अंदाज न आल्याने त्यांची दुचाकीची ट्रकच्या पाठीमागील भागावर जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित ट्रक चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून ट्रकसह पलायन केले.
या प्रकरणी मृत सूर्यकांत यांचे भाऊ चंद्रकांत अंगद सूर्यवंशी (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.