शिंगवेतील मुलींची कबड्डी स्पर्धेत बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंगवेतील मुलींची कबड्डी स्पर्धेत बाजी
शिंगवेतील मुलींची कबड्डी स्पर्धेत बाजी

शिंगवेतील मुलींची कबड्डी स्पर्धेत बाजी

sakal_logo
By

निरगुडसर, ता. १८ : यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सवांतर्गत बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये आंबेगाव तालुक्यातील शिंगवे शाळेच्या मुलींच्या संघाने अत्यंत चुरशीच्या झालेल्या कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भोर संघावर मात केली व जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे विजेतेपद मिळविले, अशी माहिती मुख्याध्यापक सुरेश लोहकरे यांनी दिली.

शिंगवे जिल्हा परिषद शाळेच्या संघाने प्रतिनिधित्व केलेला आंबेगाव संघ व भोर तालुक्यात झालेल्या अंतिम सामन्याची उत्कंठा आंबेगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सविता माळी, विस्तार अधिकारी काळूराम भवारी, गजानन पुरी, शिक्षण विभागातील अधिकारी, जिल्ह्यातील शिक्षक वृंद, खेळाडू यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवली. यशस्वी संघातील खेळाडूंना जालिंदर पोंदे, नवनाथ शिनलकर, राजेंद्र बोंबे, धनंजय पवार, संगीता शिंदे, सुषमा कदम, शेखर पोखरकर, राष्ट्रीय खेळाडू निकीता पडवळ यांनी मार्गदर्शन केले.
शिष्यवृत्ती परीक्षेत रेकॉर्डब्रेक १९ विद्यार्थी गुणवत्ताधारक झाल्यानंतर कबड्डीतील जिल्हाविजेतेपद अशी दुहेरी स्वप्नपूर्ती झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे भीमाशंकर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ, उपसरपंच संतोष वाव्हळ, अध्यक्ष बाळासाहेब गाढवे, गणेश पंडित, वैजनाथ येंधे, आशा तागड, हिरामण गोरडे, सचिन गोरडे, नवीन सोनवणे, सुहास टाके, दिलीप गोरडे, दत्तात्रेय गोरडे, किरण टाके इसाक पटेल, सुनील दाते, सोमनाथ पोंदे, समीर गोरडे, फारूख मुलाणी, धनेश सोनवणे, संदीप गोरडे विविध संस्थांचे पदाधिकारी आदींनी कौतुक केले.

00667