वाळूंजमळा येथील
अंगणवाडीतून चोरी

वाळूंजमळा येथील अंगणवाडीतून चोरी

निरगुडसर, ता. १० : जवळे (ता. आंबेगाव) येथील वाळुंजमळा अंगणवाडीचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने अंगणवाडीतील ३४ हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेल्याची घटना शनिवारी (ता. ८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चोरट्याने १५ हजार रुपये किमतीचा पोषण आहार, ९ हजार रुपयांचा एलईडी टीव्ही, ८ हजार रुपयांचा वजन काटा व २ हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अंगणवाडी सेविका संगीता वाळुंज यांनी याबाबत फिर्याद दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com