निरगुडसर येथे आयबीटी लॅबचे उद्‍घाटन

निरगुडसर येथे आयबीटी लॅबचे उद्‍घाटन

Published on

निरगुडसर, ता. १८ ः निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथे पं. ज. नेहरू माध्यमिक व द. गो. वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात आयबीटी लॅबचे उद्‍घाटन झाले. यावेळी टाटा टेक्नॉलॉजीस कंपनीच्या कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजर उमा क्रिष्णण यांची उपस्थिती होती.

टाटा टेक्नॉलॉजीस या कंपनीच्या सीएसआर फंडातून आयबीटी कार्यक्रमासाठी लागणारे सर्व साहित्य तसेच निर्देशकांचे मानधन यासाठी मदत मिळाली. आयबीटी कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कसा लाभदायक ठरत आहे, याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आयबीटीअंतर्गत तयार केलेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन या कार्यक्रमानिमित्त भरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी देखील आपापल्या प्रकल्पांची माहिती पाहुण्यांना दिली. विद्यार्थ्यांनी बनवलेले नावीन्यपूर्ण प्रकल्प पाहून सर्वांनी आयबीटी कार्यक्रम, टाटा टेक्नॉलॉजीस, स्टार्स फोरम यांनी विद्यालयाचे व विद्यार्थ्याचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी हाताने काम करत शिकतात. तसेच विद्यार्थ्यांना नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे शिक्षण देखील दिले जाते. यामध्ये विद्यार्थी समाजाच्या गरजांवर आधारित उपयोगी प्रकल्प करतात. तसेच ३डी प्रिंटिंग, अभियांत्रिकी, ऊर्जा-पर्यावरण, अन्न प्रक्रिया, शेती व पशुपालन, अशा विभागांमध्ये विविध कौशल्य आणि तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना शिकायला मिळतात. या उपक्रमाअंतर्गत शिकविल्या जाणाऱ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचाही एक भाग आहेत. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव प्रकाश तापकीर, संचालक रामसिंग वळसे पाटील, संचालक श्रीकांत पवार, सिद्धार्थ यवलकर, सुयोग वारघडे, महेंद्र भोर, सुनील वळसे पाटील, प्राचार्य साहेबराव बोरकर, सुनंदा गोरे, संतोष वळसे, कांताराम टाव्हरे आयबीटीचे सर्व निर्देशक ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.