आधुनिकतेच्या जोरावर २० गुंठ्यात फुलविले चवळीचे पीक

आधुनिकतेच्या जोरावर २० गुंठ्यात फुलविले चवळीचे पीक

निरगुडसर, ता.१० : वळती (ता.आंबेगाव) येथील धनंजय मच्छिंद्र अजाब व धोंडिभाऊ मच्छिंद्र अजाब या बंधूंनी २० गुंठे क्षेत्रावर आधुनिक पद्धतीने घेतलेल्या चवळी पिकाचे उत्पादन घेतले. त्यांनी ५० तोड्यांतून साडेसात ते आठ टन मालाचे उत्पादन घेतले. त्यास सरासरी प्रतिदहा किलोला ३५० ते ४५० रुपये बाजारभाव मिळाला. यातून सव्वा तीन ते साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न अजाब बंधूंनी मिळवले.

अजाबवस्ती येथे धनंजय व धोंडिभाऊ यांची १० एकर शेती आहे. यामध्ये त्यांनी कलिंगड, मिरची, खरबूज, झेंडू, काकडी, ऊस आदी पिके घेतली असून अजाब बंधू हे गेल्या अनेक वर्षापासून आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. चवळीचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी त्यांना मल्चिंग, ठिबक, शेणखत, कोंबडखत, बी बियाणे, खते, औषधे, फवारणी, मजुरी असा एकूण अंदाजे १ लाख रुपये पर्यंत खर्च आला आहे. असे धनंजय अजाब यांनी सांगितले.

तोडलेली चवळी ही मंचर व नारायणगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी नेण्यात आली. या अगोदर अर्धा एकर क्षेत्रावर काकडीचे पीक आधुनिक पद्घती ने घेतले होते त्यातूनही काकडी पिकाला १०० ते ३०० रुपये प्रतिदहा किलोला बाजारभाव मिळाला असून, दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा शिल्लक राहिला असल्याचे अजाब बंधूंनी सांगितले.
दरम्यान, शेतीचे उत्पादन घेण्यासाठी अजाब यांना वडील मच्छिंद्र, शोभा व मनीषा यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

चवळीच्या ५० तोड्यातून साडेसात ते आठ टन मालाच्या उत्पादनातून सव्वा तीन ते साडेतीन लाखापर्यंत उत्पन्न मिळाले आहे. अजून हे पीक तीन महिने सुरू राहणार असून अजून ७ ते ८ टन मालाचे उत्पादनाबरोबरच हाच दर टिकून राहिला तर अजून ३ लाखाहून अधिक उत्पन्न मिळण्याचा विश्वास शेतकरी
- धनंजय अजाब, चवळी उत्पादक शेतकरी

01612

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com