थोरांदळे दिंडीतील
वारकऱ्यांना ब्लॅंकेट

थोरांदळे दिंडीतील वारकऱ्यांना ब्लॅंकेट

Published on

निरगुडसर, ता. २ : थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील गोल्ड मेडल व्हॉलिबॉल संघाच्यावतीने थोरांदळे येथील श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना ब्लँकेट व इतर नित्योपयोगी साहित्यांचे वाटप केले.
थोरांदळे येथील श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी पायी दिंडी सोहळा विलास महाराज मिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २८ वर्षांपासून सुरु आहे. दिंडी सोहळ्याचे नुकतेच थोरांदळे येथून उत्साहात प्रस्थान झाले. दिंडी सोहळ्यासाठी काही तरी सामाजिक बांधिलकीतून गावातील गोल्ड मेडल व्हॉलिबॉल संघाने ठरवले. त्यानुसार दिंडी सोहळ्याचा दुसरा मुक्काम फाकटे (ता. शिरूर) येथे झाला. तेथे संघाच्यावतीने दिंडी सोहळ्यातील सहभागी वारकऱ्यांना ब्लँकेट, पाणी बॉटल व नित्योपयोगी लागणाऱ्या साहित्यांचे वाटप केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.