विरोधात बिनधास्त लढा, पण बदलेली भाषा तपासा

विरोधात बिनधास्त लढा,
पण बदलेली भाषा तपासा
Published on

निरगुडसर, ता. ३० : ‘‘भीमाशंकर कारखाना, बाजार समितीवर यापूर्वी काहींना काम करण्याची संधी दिली. आता त्यांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत. तुम्ही बिनधास्त निवडणूक लढवा. माझा त्याला विरोध नाही, परंतु आपली बदललेली भाषा जरा तपासून पहा,’’ असा टोला सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांचे नाव न घेता लगावला.
वळती (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चांडोली बुद्रुक गणात महायुती सहविचार मेळाव्यात मार्गदर्शन करताना मंत्री वळसे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सलग सात वेळा तालुक्यातील सर्व जनतेने मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. विविध खात्यांची मंत्रिपदे देखील मला मिळाली. मिळालेल्या पदांचा उपयोग मी सर्वसामान्यांच्या विकासासाठीच केला.’’
यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शिवाजीराव लोंढे, बारकू बेनके, किसन लोखंडे, मनोहर शेळके, अजय आवटे, रमेश खिलारी, सुषमा शिंदे, दादाभाऊ पोखरकर, रवींद्र करंजखेले, सुनील बाणखेले, शिवाजी राजगुरू, सचिन भोर, नितीन वाव्हळ आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन नीलेश पडवळ व अनिल वाजे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com