दोन एकर उसाला  निरगुडसर येथे आग

दोन एकर उसाला निरगुडसर येथे आग

Published on

निरगुडसर, ता. ५ : निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील चोळीचा मळ्यात विजेचे शॉर्टसर्किटमुळे शेतकरी नरहरी वळसे पाटील यांच्या तोडणीला आलेला दोन एकरहून अधिक उसाला आग लागली. ही घटना शुक्रवारी (ता.४) सायंकाळी घडली. स्थानिक शेतकरी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणल्याने संपूर्ण ऊस जळण्यापासून वाचला आणि मोठा अनर्थ टळला.
निरगुडसर येथील चोळीचामळा येथे शेतकरी वळसे पाटील यांचे उसाचे शेत आहे. तेथे शेजारीच असलेल्या रोहित्रावर तारांचे शॉर्टसर्किट होऊन उसाला आग लागली. त्यावेळी तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. महावितरणचे कर्मचारी विकास बांगर यांनी तात्काळ विद्युत पुरवठा खंडित करत घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी शेतमजूरांनी शेतातील काही ऊस तोडून त्याठिकाणी पाणी मारल्याने आग पसरली नाही.
दरम्यान, यापूर्वीही याठिकाणी अनेकदा शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या असून महावितरणने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

02126

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com