पुण्यातील ईक्वेशन वर्क कंपनीच्या 
फंडमधून निरगुडसर शाळेस १२ कॅमेरे भेट

पुण्यातील ईक्वेशन वर्क कंपनीच्या फंडमधून निरगुडसर शाळेस १२ कॅमेरे भेट

Published on

निरगुडसर, ता. १० : निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात पुण्यातील इक्वेशन वर्क कंपनी पुणे यांच्या माध्यमातून कंपनीच्या सीआरएस फंडातून १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
यामुळे चिमुकल्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुलांच्या हालचालीवर नजर ठेवता येणार आहे. शासन नियमानुसार शाळेच्या आवारात कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता शेटे यांनी दिली.
राज्य शासनाने बदलापूर दुर्घटनेनंतर सर्व प्राथमिक आणि खासगी शाळांना आदेश काढून कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार निरगुडसरचे सरपंच रवींद्र वळसे पाटील, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुवर्णा शिंदे, उपाध्यक्ष बाबाजी मेंगडे, सहशिक्षक नारायण गोरे यांनी संबंधित कंपनीशी संपर्क साधून कॅमेरे मिळावेत याबाबत पाठपुरावा केला. त्यानुसार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल अडसोल, अमित शहा, गणेश गवळी यांनी पुढाकार घेऊन बावधन येथे शाळेला १२ सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले.
शासन नियमानुसार परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि त्याचे फुटेज दररोज तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर देण्यात आली आहे. आठवड्यातून किमान तीन वेळा शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी ते सीसीटीव्ही फुटेज पाहावे, तसेच शाळांमधील नियमित कर्मचाऱ्यांसह कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या सुरक्षारक्षक, सफाई कामगार, मदतनीस, बसचालक यांची चारित्र्य पडताळणी करावी. शाळांमध्ये बाह्यस्रोतांद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचारी नेमावा शाळांमध्ये तक्रारपेटी ठेवावी, असे शासन निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com