निरगुडसरला दत्तजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

निरगुडसरला दत्तजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Published on

निरगुडसर, ता. १३ : निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी (ता. १४) दतजयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सकाळी ६ ते ७ वाजता श्रींचा अभिषेक व पूजा, ९.३० ते १०.१५ वाजता मुंजाबा प्रासादिक भजन मंडळ दांगटवस्ती यांचा भजनाचा कार्यकम होईल. सकाळी १०.१५ ते ११.४५ भरत महाराज थोरात यांचे प्रवचन होईल. दुपारी १२ वाजता दत्तजन्म सोहळा होईल. त्यानंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात येईल. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते प्रतापराव वळसे पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष रामदास वळसे पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राचार्य कांताराम टाव्हरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com