

निरगुडसर, ता. ४ : जाहीर केलेल्या जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या दूध अनुदानाचे थकलेले ११ कोटी आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे १४१ कोटी असे एकूण १५२ कोटी रुपयांचे अनुदान सरकारने जिल्ह्यातील उत्पादकांचे थकविले आहे. वाढलेला उत्पादन खर्च यामुळे दूध व्यवसाय परवडत नाही. रखडलेल्या अनुदानामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आता मार्च महिन्यात जिल्हा बँकेचे सोसायटीचे कृषी कर्ज शेतकऱ्यांना भरायचे आहे ते भरावे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला.
शासनाच्या १२ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान योजना सरकारने जाहीर केली, ही योजना एक जुलै २०२४ पासून सुरू झाली. या योजनेत जिल्ह्यातील ११८ सहकारी व खासगी दूध प्रकल्पांनी सहभाग नोंदवला आहे. सरकारने एक जुलै ते ३० सप्टेंबर २०२४ या तीन महिन्यांसाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी दुधाला फॅट ३.५ आणि ८.५ ‘एसएनएफ’साठी ३० रुपये दर होता. या तीन महिन्यांचे १७९ कोटी रुपयांचे अनुदान सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिले असून, अजून ११ कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. एक ऑक्टोबर २४ पासून प्रतिलिटर अनुदान दोन रुपये वाढ करून सात रुपये अनुदान देण्याचे जाहीर करून दूध दर फॅट ३.५ आणि ८.५ एसएनएफसाठी २८ रुपये केला होता. हे अनुदान शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही. पुणे जिल्ह्यातील पाच लाख ७७ हजार ६०७ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या २० कोटी १६ लाख ३४ हजार ३०१ लिटर दुधाचे प्रतिलिटर सात रुपये दराने १४१ कोटी सात लाख ८२ हजार ७०९ रुपये अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही.
अनुदानासाठी सरकारच्या जाचक अटी
मागील जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याचे १७९ कोटी वाटप केले परंतु अद्याप ११ कोटी सरकारकडून मिळणे बाकी आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यासाठी ७०० हून अधिक प्रस्ताव अनुदानासाठी पुणे जिल्ह्यातील संस्थानी जमा केले होते परंतु ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याच्या अनुदानासाठी ४३९ फाईल जमा झाल्या आहेत कारण की अनुदानासाठी सरकारच्या जाचक अटी, दूध अनुदानही वेळेत आणि मिळेल की नाही यातून दूध अनुदानासाठी प्रस्ताव दिले देखील नाही.
दृष्टिक्षेपात
* ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन महिन्यासाठी प्रतिलिटर सात रुपये दराने अनुदान.
* पुणे जिल्ह्यातील ४३९ प्रस्ताव सरकारकडे जमा.
*पुणे जिल्ह्यातील ५ लाख ७७ हजार ६०७ दूध उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान रखडले
*जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या अनुदानापोटी १७९ कोटी शेतकऱ्यांना वाटप.
* जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यातील ११ कोटी रुपये अजून शेतकऱ्यांना देणे आहे.
अनुदानाचे एकूण दूध : २० कोटी १६ लाख ३४ हजार ३०१ लिटर.
रखडलेले अनुदान: १४१ कोटी ७ लाख ८२ हजार ७०९ रुपये (ऑक्टोबर व नोव्हेबर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.