पावसाळ्यात वीजसुरक्षेबाबत घ्या खबरदारी

पावसाळ्यात वीजसुरक्षेबाबत घ्या खबरदारी

Published on

निरगुडसर, ता. २४ : शहरी व ग्रामीण भागात मॉन्सूनपूर्व पावसाची कोसळधार सुरू आहे. येत्या काही दिवसांत मॉन्सूनचे आगमन होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात वीजसुरक्षेबाबत अधिक सजग राहण्याची गरज आहे. पाणी हे विजेचे चांगले वाहक आहे. त्यामुळे प्रामुख्याने रस्त्यावरील सार्वजनिक वीजयंत्रणा, पथदिव्यांच्या लोखंडी खांबापासून आणि घरगुती वीज उपकरणांपासून विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणकडून केले आहे.
अतिवृष्टी, वादळी पावसामुळे तुटलेल्या वीजतारा, पथदिवे, वीजखांब रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तू, साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते.मुसळधार पाऊस व जोराचा वारा यामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात.वीजखांब वाकतात, वीजतारा तुटतात,लोंबकळत राहतात. अशा वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावध राहावे,या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.

अशी घ्या काळजी
१. विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क होऊ देऊ नका
२.फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी ॲल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरा
३.काही बिघाड झाल्यास वीजपुरवठा तत्काळ खंडित होतो व संभाव्य धोका टळतो.
४. घर किंवा इमारतीवरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अँटेना वीज तारांपासून दूर ठेवावे,
५. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये तसेच विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही याची दक्षता घ्यावी.
६. विजेवर चालणारे सर्व उपकरणे नेहमी स्वीचबोर्डपासून बंद करावे.
७. पथदिवे किंवा विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत तसेच त्यास दुचाकी टेकवून ठेवू नये


सोसायटीधारकांनी घ्यावी काळजी
सोसायटीमध्ये पथदिवे असल्यास सर्व पथदिव्यांचे अर्थिंगचे आणि वायरिंगचे जाईंट सुस्थितीत असल्याचे संबंधित सोसायट्यांनी नोंदणीकृत विद्युत कंत्राटदारांकडून तपासणी करून घ्यावी. पावसाळ्यामध्ये लोखंडी पत्र्याची घरांचा किंवा इमारतीमध्ये लोखंडी जिन्याचा वापर करीत असल्यास त्या ठिकाणच्या वीजयंत्रणेचे अर्थिंग व्यवस्थित असल्याची खात्री करावी.बहुतेक इमारतींच्या तळमजल्यावर वीजमीटर बसविलेले आहेत. पावसाळ्यात अनेक इमारतींमध्ये पाण्याचा निचरा होत नाही .त्यामुळे तळमजल्यामध्ये पाणी साचते. वीजमीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढते अशा वेळी वीजपुरवठा बंद ठेऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधितांनी महावितरणशी तत्काळ संपर्क साधावा.


वीज ग्राहकांसाठी २४ तास टोल फ्री क्रमांक
वीजविषयक किंवा कोणत्याही प्रकारच्या तक्रारींसाठी महावितरणचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक वीजग्राहकांसाठी २४ तास उपलब्ध आहेत.यासह मोबाईल ॲप www.mahadiscom.in वेबसाईटद्वारेही तक्रारी नोंदविण्याची सोय आहे. सोबत फोटो.

02604

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com