नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात

नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात
Published on

निरगुडसर, ता. १६ : खडकी (ता. आंबेगाव) येथील काळभैरवनाथ लक्ष्मीबाई बाबूराव बांगर विद्यालयात शालेय नवीन प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व स्वागत ग्रामस्थ व सर्व शिक्षकांच्या हस्ते गुलाबपुष्प व खाऊ देऊन आणि सेल्फी घेऊन केले.
यानिमित्ताने दहावीमध्ये प्रथम पाच क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार खडकीचे सरपंच दत्तात्रेय बांगर, कृष्णा भोर, दीपक बांगर व पालक नानाभाऊ शेठ वाबळे यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन केल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी दिली. यावेळी शाळेच्या पहिल्याच दिवशी लीला फाउंडेशनमधील सातवी ते दहावीतील एकूण ५७ विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तके वह्या व इतर शालेय साहित्याचे वाटप केले. पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना शासनाची मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली.
मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. रामकृष्ण राजगुरू यांनी सूत्रसंचालन केले. संजीव पिंगळे, मंगल सोनार, प्रभाकर झावरे, ज्योत्स्ना खेडकर, माधुरी थोरात, रूपाली ठाकूर, धम्मपाल कांबळे, बाळासाहेब विधाटे, संतोष खालकर, रामदास लबडे, रामदास भांड, नीलेश भालेराव यांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com