खडकीच्या तरुणाीवर बिबट्याचा हल्ला

खडकीच्या तरुणाीवर बिबट्याचा हल्ला

Published on

निरगुडसर, ता.१३ : खडकी-चांडोली रस्त्यावर बिबट मादी आणि बछडा रस्ता ओलांडत होती. त्यावेळी दुचाकी बछड्याजवळ थांबली. त्यामुळे मादी आक्रमक होऊन तिने खडकी (ता.आंबेगाव) येथील नीलम चंद्रकांत वाबळे (वय ३१) या तरुणीवर हल्ला केला. आरडा ओरड आणि दुचाकीची रेस वाढवल्यामुळे मादी पसार झाला. ही घटना शनिवारी (ता.११) सायंकाळी साडेसात वाजता घडली.

नीलम वाबळे शनिवारी चाकण वरून खडकीकडे आपल्या घरी जात होती. परंतु साडेसात वाजता रस्त्यावर बिबट्याचा बछडा आला म्हणून थांबली. यावेळी मागून येणाऱ्या मादीने
तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सुदैवाने एक पंजा पाठीवर असलेल्या सॅकवर पडला. मात्र, यावेळी नीलमच्या डाव्या हाताला जखम झाली. दरम्यान, रस्त्यावरून येणारी इतर वाहने आणि दुचाकीची रेस वाढवल्याने बिबटमादी पुन्हा मागे पळाली. पण बछडा पलीकडे आणि मादी अलीकडे राहिल्याने मादी काय स्वस्थ बसेना. तिने रस्त्यावरून त्याच्याकडे पलीकडे जात असताना दोन दुचाकीस्वरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोचले. त्यांनी रस्ता बंद केला. यामुळे वातावरण शांत झाले. यावेळी वनपाल सोनल भालेराव, विशाल वाबळे, बिबट शीघ्र कृती दल गावडेवाडीचे पथक यांनी जखमी नीलमला उपचारासाठी मंचर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात केले.
दरम्यान, जुन्नर उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी जखमी मुलीची भेट घेतली. यावेळी मंचर वनपरिक्षेत्राधिकारी विकास भोसले, वनपाल सोनल भालेराव उपस्थित होते.


02892

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com