वखारवाडी येथे बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

वखारवाडी येथे बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

Published on

निरगुडसर, ता. २५ ः वखारवाडी (ता. आंबेगाव) येथील शेतकरी जितेंद्र गोरक्षनाथ गावडे यांच्या कुत्र्यावर मंगळवारी (ता. २४) मध्यरात्री बिबट्याने हल्ला केला. परंतु, सुदैवाने बिबट्याच्या तावडीतून कुत्रा निसटला. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु, वनविभागाकडून कुठल्याही प्रकारे कार्यवाही, जनजागृती केली जात नाही. पिंजऱ्याची मागणी करून देखील पिंजरे लावले जात नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करीत आहेत. याच परिसरात तीन दिवसांपूर्वी विश्वनाथ हरिभाऊ जांभळे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. एकाच आठवड्यात बिबट्याकडून दोनवेळा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने घटनेचे गांभीर्य ओळखून या परिसरात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com