बिबट्याच्या हल्ल्यात भराडीत कुत्र्याचा मृत्यू
निरगुडसर, ता.२८ : भराडी (ता.आंबेगाव) येथील वखारवाडी येथील शेतकरी जितेंद्र गोरक्षनाथ गावडे यांच्या इंग्लिश कुत्र्यावर बिबट्याने बुधवारी हल्ला करून जखमी केले होते. परंतु या कुत्र्याचा गुरुवारी (ता.२६) सकाळी मृत्यू झाला आहे.
बिबट्याची दहशत वाढल्याने वनविभागाने पिंजरा लावला आहे. दरम्यान, बिबट्या मंगळवारी (ता.२४) मध्यरात्रीच्या बिबट्याने गावडे यांच्या इंग्लिश कुत्र्यावर आठ फूट जाळीवरून आत प्रवेश करत हल्ला केला. यामध्ये कुत्रा जखमी झाला. त्याच्यावर उपचार देखील करण्यात आले. परंतु प्रयत्नांना यश आले नाही आणि गुरुवारी (ता.२६) कुत्र्याचा मृत्यू झाला. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. पोलिस पाटील संतोष खिलारी यांनी हल्ल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर अखेर वनविभागाकडून बुधवारी दुपारी पिंजरा लावण्यात आला आहे. या अगोदर याच परिसरातील विहिरीत पडलेला बिबट्या वनविभागाकडून रेस्कू केला होता. या परिसरात अजून बिबटे असून या ठिकाणी पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी शेतकरी जितेंद्र गावडे यांनी केली आहे.
03169
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

