थोरांदळे- जाधववाडी रस्त्याची दुरवस्था

थोरांदळे- जाधववाडी रस्त्याची दुरवस्था

Published on

निरगुडसर, ता. ५ ः थोरांदळे ते जाधववाडी- महानुभाव ‌आश्रम (ता. आंबेगाव) या साडेतीन किमी रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षापासून रस्त्याची साधी दुरुस्ती देखील झाली नाही. रस्त्यावर शेकडो खड्डे पडल्याने रस्त्यावरील प्रवास धोकादायक बनला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
हा साडेतीन किलोमीटर रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेला असून, या रस्त्याला सहा वर्ष होऊन गेले आहे. गेल्या दोन वर्षात रस्त्यावरील एकही खड्डा बुजवला नसल्याचे जाधववाडीचे सरपंच संपत जाधव यांनी सांगितले. थोरांदळे ते ‌जाधववाडी रस्ता दळणवळणासाठी महत्त्वाचा असून, जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रवाशांची गर्दी असते. परंतु, या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असल्याने प्रवाशांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि रस्त्याच्या कामासाठी नव्याने निधी देण्याची मागणी जाधववाडी, थोरांदळे ग्रामस्थांनी केली आहे.

03184

Marathi News Esakal
www.esakal.com