थोरांदळे- जाधववाडी रस्त्याची दुरवस्था
निरगुडसर, ता. ५ ः थोरांदळे ते जाधववाडी- महानुभाव आश्रम (ता. आंबेगाव) या साडेतीन किमी रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षापासून रस्त्याची साधी दुरुस्ती देखील झाली नाही. रस्त्यावर शेकडो खड्डे पडल्याने रस्त्यावरील प्रवास धोकादायक बनला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
हा साडेतीन किलोमीटर रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून झालेला असून, या रस्त्याला सहा वर्ष होऊन गेले आहे. गेल्या दोन वर्षात रस्त्यावरील एकही खड्डा बुजवला नसल्याचे जाधववाडीचे उपसरपंच संपत जाधव यांनी सांगितले. थोरांदळे ते जाधववाडी रस्ता दळणवळणासाठी महत्त्वाचा असून, जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रवाशांची गर्दी असते. परंतु, या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असल्याने प्रवाशांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि रस्त्याच्या कामासाठी नव्याने निधी देण्याची मागणी जाधववाडी, थोरांदळे ग्रामस्थांनी केली आहे.
03184
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

