दहा दिवस हुलकावणी देणारी बिबट मादी रांजणीत जेरबंद

दहा दिवस हुलकावणी देणारी 
बिबट मादी रांजणीत जेरबंद
Published on: 

निरगुडसर, ता. ६ ः वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्याला दहा दिवस हुलकावणी देणारी बिबट मादी अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावाच्या दक्षिणेला असलेल्या वाकोबा मळा परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात चार ते पाच वर्षांची बिबट मादी जेरबंद झाली.
बुधवारी (ता. २३ सप्टेंबर) अक्षय रामदास वाघ हे शेताला पाणी देण्यासाठी गेले होते. पाण्याचा वॉल्व्ह फिरवण्यासाठी ते खाली वाकले असता अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप मारली. मात्र, प्रसंगावधान राखत अक्षय यांनी बिबट्याचा प्रतिकार केला आणि तेथून पळ काढला.
पळत असताना त्यांचा पाय घसरून ते खाली पडले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. या घडलेल्या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने शिरीष वाघ यांच्या शेतात पिंजरा लावला.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पिंजऱ्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते. अखेर दहा दिवसांनी सोमवारी पिंजऱ्यात बिबट मादी अडकल्याचे निदर्शनास आले. या बिबट मादीचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याची माहिती वनविभागाने दिली. बिबट मादी जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वळती बीटचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एम. फुलमाळी, वनकर्मचारी महेश टेमगिरे तसेच गावडेवाडी बिबट कृती दलाचे धर्मेंद्र ढगे, प्रज्वल आवारी, चारुदत्त बांबळे, ओंकार मेंगडे आदी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट मादीला सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com