उसाचे पाचट पेटविण्याची हरित लवादाकडून नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उसाचे पाचट पेटविण्याची हरित लवादाकडून नोंद
उसाचे पाचट पेटविण्याची हरित लवादाकडून नोंद

उसाचे पाचट पेटविण्याची हरित लवादाकडून नोंद

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता.१७ : राज्यातील साखरेचा हंगाम निम्म्यावर आला आहे. हंगामातील ऊसतोडणी जोमात सुरू असून, ऊस तुटून गेल्यावर शेत मोकळे करण्यासाठी फडातील पाचट पेटविले जात आहे. त्यामुळे हवेत व परिसरातील घराच्या अंगणात काजळी (पाचटाचा जळलेला भाग) पडत आहे. यामुळे उसाच्या फडातील पाचट पेटवल्याने पर्यावरणाचे नुकसान होत असल्याची नोंद राष्ट्रीय हरित लवादाने गांभीयनि घेतली आहे.
शेतातील पाचट काढणे व नव्या लागवडीसाठी शेत मोकळे केले जात आहे. पिकाच्या कापणी व तोडणीनंतर शेतातील फड पेटविण्याची प्रथा आहे. उत्तर भारतात गहू आणि भाताच्या कापणीनंतर, तर महाराष्ट्रात ऊसतोडीनंतर फड पेटविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात, त्यामुळे धूर होऊन हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यामुळे नागरिकांना स्वसनाच्या आणि आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. राज्यात होणाऱ्या प्रदूषणाला फड पेटविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचा निष्कर्ष लावण्यात आला होता. यावर न्यायालयाने यापूर्वीच बंदीचे अस्त्राची नजर उसाच्या फड पेटविण्याकडे गेली असून, लवादाने महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांतील सरकारी यंत्रणेला उसाचा फड पेटवण्यासही बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.

उसाचे पाचट पेटविल्याने जैवविविधता लोप पावत आहे. पाचटाच्या धुरामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत चालले आहे. हरित लवादाने शेतकऱ्यांना पाचट पेटविण्यापेक्षा कुट्टी करून कुजविण्यास सांगितले आहे. पर्यावरणाचा होणारा हास थांबवला नाही, तर २०५० पर्यंत याचे गंभीर परिणाम भोगावे लागते
- प्रा. बाळासाहेब साळुंके, पर्यावरण विषयाचे अभ्यासक
03051