अकलूज-इंदापूर एसटी नियमित करण्याची मागणी

अकलूज-इंदापूर एसटी नियमित करण्याची मागणी

नीरा नरसिंहपूर, ता. २९ : तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानला इंदापूर आगाराची अकलूजहून येणारी एकच एसटी बस आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडते. त्यातच इंदापूर आगाराचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे चालक आणि वाहकांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
नीरा नरसिंहपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे भाविकांची वर्दळ असते. दशक्रिया, नारायण नागबळी, कालसर्प अशा धार्मिक विधीसाठी विविध गावातून येथे नागरिक येतात. परंतु एसटीच्या अनियमिततेमुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. बावडा नरसिंहपूर राज्य मार्गावरील आठ ते दहा गावांतील विद्यार्थी, नागरिकांना बाहेर गावाहून येणाऱ्या एसटीचा आधार घ्यावा लागत आहे. अनेकदा शासकीय सुट्टीचा दिवस, शनिवार, रविवारच्या दिवशी अचानकपणे एसटीची फेरी बंद करण्यात येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
यासंदर्भात इंदापूर आगाराचे व्यवस्थापकांना वारंवार सांगूनही त्याबद्दल कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. एसटीमध्ये बसण्याची बाके तुटलेली आहेत. तर वेळापत्रकानुसार एसटीच्या फेऱ्या न होता कोणत्याही वेळेत ती धावते असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील एसटीच्या फेऱ्या वाढवून ती नियमित करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com