बावडा येथे रांगोळीतून 
तुकोबांची प्रतिकृती

बावडा येथे रांगोळीतून तुकोबांची प्रतिकृती

Published on

नीरा नरसिंहपूर, ता. ११ ः संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या आगमनानिमित्त बावडा येथील भाग्यश्री अंकुश घाडगे यांनी रांगोळी काढली. यात तुकाराम महाराज व इतर संतांची अप्रतिम प्रतिकृती हुबेहूब साकारली. संस्थानच्या विश्वस्तांनी रांगोळीला भेट देवून त्याची पाहणी केली.
जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त भानुदास महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, मुकेश महाराज मोरे, विक्रम महाराज मोरे व पालखी रथाच्या बैलजोडीचे मानकरी भानुदास शेठ खांदवे, पैलवान प्रशांत शेंडगे, गौरव साखरे, रवी काळभोर, शुभम धुमाळ यांनी भाग्यश्री घाडगे यांच्या रांगोळीला भेट देऊन त्यांचे कौतुक करून सत्कार केला.
यावेळी घाडगे परिवाराच्या वतीने महादेवराव घाडगे (संचालक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना अकलूज) यांनी वरील मान्यवरांचा सत्कार केला. या प्रसंगी शंकर घाडगे, अंकुश घाडगे, रणजित घाडगे, अभिजित घाडगे आदि उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.