रस्त्यावरच अंत्यविधी करण्याचा इशारा

रस्त्यावरच अंत्यविधी करण्याचा इशारा
Published on

नीरा नरसिंहपूर, ता. २७ ः गिरवी ते पाटीलवस्ती दोन किलोमीटर पाणंद रस्ता पोखरून अडवला. विसफुटी रस्ता पोखरून सहा फुटी ठेवून १५० शालेय विद्यार्थी, २०० घरांतील नागरिकांच्या रस्त्याची अडवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून रस्ता खुला करावा, अशा मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले. अन्यथा, गिरवी-आडोबा रस्त्यावरच अंत्यविधी करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गिरवी (ता. इंदापूर) येथील आडोबा-गिरवी रस्त्याला जोडून असणारा गिरवी-क्षिरसागर, वाघ, ननवरे, ठोंबरे व पाटीलवस्ती असा दोन किलोमीटर विसफुटी पाणंद रस्ता आहे. याठिकाणी जवळपास १५० ते २०० घरांची लोकवस्ती आहे. येथील नागरिकांना ये-जा साठी हा एकमेव मार्ग आहे. या वस्तीवरील बालवाडी ते दहावीपर्यंतच्या जवळपास १०० ते १५० विद्यार्थी व नागरिकांना याच रस्त्याने जावे लागते. या पाणंद रस्त्याला २०१२-१३ मध्ये पुणे जिल्हा परिषदेने चार लाख ९७ हजार ५०६ रुपयांचा निधी मंजूर करून मुरूमीकरण केले आहे. परंतु, दिलीप श्रीमंत क्षिरसागर, पांडुरंग क्षिरसागर, अशोक क्षिरसागर यांनी २० फुटी रस्ता पोखरून सहा फुटीच करून अडवणूक केली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्यात चिखल तुडवत जावे लागत आहे. तर एखाद्या नागरिकाचे निधन झाले, तर रुग्णवाहिकाही जाऊ शकत नाही. तर एखाद्याच्या घराला आग लागली तर अग्निशमन दलाचे वाहनही जाऊ शकत नसल्याने मोठे नुकसान होऊ शकते.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रेय भरणे, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना निवेदनाच्या प्रती दिले आहेत. यावर पाणंद रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या सह्या आहेत. यापुढे रस्ता खुला केला नाही तर गिरवी-आडोबा रस्त्यावरच मृतदेहाचे अंत्यविधी करण्याचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये अडथळा काढण्याचा आदेश
यासंदर्भात तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या न्यायालयात अर्जुन क्षिरसागर, गुलाब क्षिरसागर, प्रदिप क्षिरसागर, तिळदेव क्षिरसागर, बाबासो क्षिरसागर, शिवाजी क्षिरसागर व हनुमंत क्षिरसागर यांनी दिलीप क्षिरसागर, पांडुरंग क्षिरसागर व अशोक क्षिरसागर यांच्या विरोधात गट नंबर ३३, ११९, ११२, १६, २५, २३ मिळकतीबाबत अर्ज दाखल केला होता. त्यावर मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०६ चे कलम ५(२) नुसार ये-जा करण्यासाठी पूर्वापार असणाऱ्या गट नंबर १७ मधील रस्त्यावरील जाब देणाऱ्यांनी वहिवाटीस केलेला अडथळा स्वतःहून पंधरा दिवसांत काढून घ्यावा, असा आदेश नऊ ऑगस्ट २०२३ मध्ये दिला आहे. परंतु, अद्यापही रस्ता खुला करून दिला नसून उलट यावरून जाण्यास मज्जाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com