गणेशवाडी पुलावरील वाहतूक बंद

गणेशवाडी पुलावरील वाहतूक बंद
Published on

नीरा नरसिंहपूर, ता.२७ : उजनी धरणातून भीमा नदीत ८१ हजार ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे तर वीर धरणातून नीरा नदीत काल सोडण्यात येत असलेला ७१ हजार क्युसेकचा विसर्ग कमी करून ५५१५७ क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नरसिंहपूर येथील संगमावर एक लाख ३६ हजाराचा विसर्ग वाहत आहे. तर भीमा नदीवरील तीन बंधाऱ्यासह गणेशवाडी पूल आजही पाण्याखाली असल्याने प्रशासनाने पुलावरील वाहतूक रात्रीपासून बंद केली होती.
उजनीतून वीज निर्मितीसाठी १६००, कालवा १६००, बोगदा २००, सिनामाढा उपसा १७५ तर दहिगाव उपसा ८० क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे. पाणी पातळी ४९७.०३० मीटर, पाणीसाठा १२०.६२ टीएमसी, १०४.४६ टक्के भरले असून दौंड येथून उजनी धरणात ७९ हजार क्युसेकचा विसर्ग येत आहे.
वीर धरणातून नीरा नदीत कालचा ७१ हजार क्युसेकचा पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत होता. आज कमी करून ५५१५७ हजार क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे यावरील काही बंधाऱ्यावरील पाणी कमी झाले आहे. परंतु यावरील वाहतूक बंदच ठेवण्यात आली आहे. भीमा व नीरा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे पुन्हा पूरसदृश पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे. जलसंपदा विभाग सोलापूर, धरण नियंत्रण विभाग भीमानगर, धरण नियंत्रण विभाग नीरा खोरे - वीर धरण व पूर नियंत्रण विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच भीमा नदीवरील गणेशवाडी-गारअकोले यांना जोडणाऱ्या पुलावरून काल सायंकाळी सात वाजल्यापासून दोन ते तीन फूट पाणी वाहत असून आजही पूरस्थिती जैसेथेच ठेवण्यात आली आहे. तसेच यावरील वाहतूक काल रात्रीपासून अद्यापही बंदच ठेवली आहे. तर भांडगाव, टणू, नरसिंहपूर बंधारे आजही पाण्याखालीच गेलेले आहेत. नरसिंहपूर संगम व नरसिंहपूर शेवरे पुलावरून वाहतूक सुरळीत सुरू आहे. तर नीरा नदीवरील काही बंधाऱ्यांतील पाणी आज कमी झाले आहे. परंतु बंधाऱ्यांवरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंदच ठेवण्यात आली आहे.
04271

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com