ओझरे येथे कारगिल हुतात्मा वजीर दत्तात्रेय रास्ते यांना आदरांजली

ओझरे येथे कारगिल हुतात्मा वजीर दत्तात्रेय रास्ते यांना आदरांजली
Published on

नीरा नरसिंहपूर, ता. ३० : ओझरे (ता. इंदापूर) येथील कारगिल हुतात्मा वजीर दत्तात्रेय रास्ते यांच्या २५ व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ओझरे (ता. इंदापूर) येथील कारगिल शहीद जवान वजीर दत्तात्रेय रास्ते यांच्या २५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, तहसीलदार जिवन बनसोडे, माजी कर्नल बी. जी. पाचर्णे, इतर माजी सैनिक तसेच शहीद जवान यांच्या पत्नीसह, सामाजिक कार्यकर्ते तसेच ओझरे परीसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार दत्तात्रेय भरणे म्हणाले, ‘‘कारगिल हुतात्मा वजीर रास्ते यांनी कुटुंबाची परवा न करता देशासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांचे बलिदान तालुका व देशासाठी भूषणावह बाब आहे. त्यांचे वीर पिता दत्तात्रेय रास्ते व वीर माता बायडाबाई रास्ते यांच्या कार्याला आमचा सलाम आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com