गणेशवाडी गावात दारूबंदीसाठी समितीची स्थापना

गणेशवाडी गावात दारूबंदीसाठी समितीची स्थापना

Published on

नीरा नरसिंहपूर, ता. १७ ः गणेशवाडी (ता. इंदापूर) गावात दारू जवळ बाळगणे आणि विक्री करताना निदर्शनास आल्यास कारवाई करणार, असे बावडा दूरक्षेत्रचे पोलिस हवालदार जगन्नाथ कळसाईत यांनी सांगितले. दरम्यान, गणेशवाडी गावात दारूबंदी समितीची स्थापना करण्यात आली.

गणेशवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दारूबंदी संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत
आरिफ सय्यद, पोलिस पाटील किरण खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थिती होती, या वेळी ते बोलत होते. दरम्यान, गणेशवाडी गावात दारूबंदी समितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष सुरेश घोगरे, उपाध्यक्ष सागर खंडागळे, हरिदास घोगरे, दत्तात्रेय शिंदे, सुजित घोगरे, अण्णासो घोगरे, हरिदास घोगरे, ज्ञानेश्वर साठे, राधिका घोगरे, स्वाती घोगरे, अलका खंडागळे, अश्विनी साठे, सरस्वती साठे, लतिका कांबळे, पोलिस हवालदार जगन्नाथ कळसाईत, पोलिस आरिफ सय्यद, पोलिस पाटील किरण खंडागळे यांची समितीत निवड केली आहे.

कळसाईत म्हणाले, ‘‘ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जानुसार संबंधित दारू विक्रेत्यांना नोटीस दिली आहे. त्यानंतरही दारू विक्री व जवळ बाळगल्यास कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त कडक शिक्षा करण्यात येईल. नागरिकांनी दारू विक्री करणाऱ्यांचा फोटो काढून आम्हाला पाठवावा, त्याला सोडले जाणार नाही. आमच्याकडून त्यांना कोणतेही मदत केली जाणार नाही. दारूबंदी कायमची शंभर टक्के करण्यात येईल. नागरिकांच्या सह्यांचा अर्ज, ग्रामपंचायत ठरावाची प्रत दौंड येथील उत्पादन शुल्क विभागालाही द्यावा. मात्र, चुकीची माहिती दिल्यास त्यांच्यावर कारवाई करू.’’

दत्तात्रेय शिंदे, अश्विनी साठे, सुरेश घोगरे, हरिदास घोगरे, सागर खंडागळे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी हरिदास घोगरे, शंकर शिंदे, केशव घोगरे, दत्तात्रेय शिंदे, सुधाकर कांबळे, राधाबाई घोगरे, सुंदराबाई तावरे, शालन तावरे, विठाबाई घोगरे, बायडाबाई मगर, रतन खंडागळे, अलका खंडागळे, अश्विनी साठे, नंदाबाई आवाड, अनिता गायकवाड आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com