

नीरा नरसिंहपूर, ता.१० : नरसिंहपूर (ता.इंदापूर) परिसरात उन्हाळी बाजरी पीक जोमात आले आहे. पोषक हवामानामुळे बाजरी फुलोऱ्यात आली आहे. चिकात आलेल्या बाजरी पिकाला पक्षी मोठ्या प्रमाणावर उपद्रव करत आहेत. त्यामुळे पाखरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी त्यांना हुसकावण्यासाठी प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर, गोफण तसेच चमकदार पट्ट्यांचा शेतकऱ्यांकडून वापर केला जात आहे.
यंदा भीमा नदीला मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, टणू, गिरवी आदी परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील बाजरी व भुईमूग पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. उन्हाळी हंगामात बाजरीवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी आढळतो. उत्पन्न देखील चांगले मिळते. बाजरीचे बाजारभाव चांगले असल्यामुळे उन्हाळी हंगामात हे पीक घेणे परवडते. शिवाय चाराही मिळत असल्याने सध्या बाजरीचे पीक फुलोऱ्यात आले असून, उपलब्ध पाणी आणि स्वच्छ हवामान यामुळे बाजरीचे पीक जोमात आले आहे, असे शेतकरी अंकुश शिंदे यांनी सांगितले.
अकलूज, इंदापूर बाजार पेठेत बाजरीला ठोक बाजारभाव क्विंटलला २६०० ते २७०० तर किरकोळ बाजारात ३० ते ३२ रुपये किलोप्रमाणे बाजारभाव मिळत आहे.
04688
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.